Home Guard Bharati 2024 I होमगार्ड भरती 2024 I उद्या पासून सुरु होणार! सुमारे ९५०० पदांसाठी भरतीची अर्ज प्रक्रिया!

Home Guard Bharati 2024

पदाचे नावपद संख्या 
होमगार्ड10,285 पदे

Home Guard Bharati 2024 : महाराष्ट्र राज्यातील होमगार्डच्या नोकऱ्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. गृह विभागामार्फत येत्या काही दिवसांपासून होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुरु होणार असून, सुमारे ९,७०० पदांसाठी ही भरती होण्याची शक्यता आहे. होमगार्ड पदासाठी राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ३४ जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. उमेदवारांनी १५ जुलै २०२४ पासून सातारा, इतर जिल्ह्यांसाठी ऑनलाइन लिंक २५ जुलै २०२४ पासून सक्रिय केली जाईल, आणि बीड होमगार्ड भरती ऑनलाइन लिंक २६ जुलै २०२४ रोजी सक्रिय होईल. देय तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

या नोकरीसाठी २० ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतील. विशेष म्हणजे, जवळपास ६ वर्षांपूर्वी ही भरती करण्यात आली होती. २०१८-१९ या वर्षात होमगार्ड पदासाठी भरती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील या होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना शारीरिक क्षमता परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे. त्यामुळे महा होमगार्ड भरती २०२४ साठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा.

भरतीसंबंधी अधिक तपशील PDF फाईलमध्ये दिले आहेत, ज्यामध्ये प्रारंभ आणि शेवटची तारीख, वेळापत्रक, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया यासारखी माहिती आहे. तसेच ऑनलाइन नोंदणी, अर्ज आणि इतरांसाठी अधिकृत वेबसाइट लिंक देखील दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड भरतीसाठी जिल्हानिहाय अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे. उमेदवारांनी नोंदणीचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Home Guard Bharati 2024

Sr Noजिल्हाअर्ज भरण्याचा कालावधीजिल्हा निहाय अर्ज भरण्याकरीता आवश्यक माहिती
1सातारादि. 15/07/2024 ते 31/07/2024सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024– थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
2नांदेडदि. 25/07/2024 ते 14/08/2024नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024– थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
3रत्नागिरीदि. 25/07/2024 ते 14/08/2024रत्नागिरी जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024– थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
4जळगावदि. 25/07/2024 ते 14/08/2024जळगाव जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024– थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
5चंद्रपूरदि. 25/07/2024 ते 10/08/2024चंद्रपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024– थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
6यवतमाळदि. 25/07/2024 ते 14/08/2024यवतमाळ जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 – थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
7सिंधुदूर्गदि. 25/07/2024 ते 14/08/2024सिंधुदूर्ग जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024– थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
8धुळेदि. 25/07/2024 ते 14/08/2024धुळे जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024– थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
9हिंगोलीदि. 25/07/2024 ते 14/08/2024हिंगोली जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024– थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
10अमरावतीदि. 25/07/2024 ते 05/08/2024अमरावती जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024– थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
11बीडदि. 26/07/2024 ते 16/08/2024बीड जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024- थेट लिंकद्वारे करा अर्ज!!

होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांनी वरील माहिती पत्रकांचा उपयोग करून अर्ज भरावा आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

Home Guard Bharati

Home Guard Bharati 2024 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी किमान १० वी उत्तीर्ण (SSC) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय 20 ते 50 वर्षे (दि. ३१/०७/२०२४ रोजी) या दरम्यान असावे.

शारीरिक पात्रता

  • पुरुष उंची: १६२ से.मी.
  • महिला उंची: १५० से.मी.
  • छाती (फक्त पुरुष उमेदवारांसाठी): न फुगविता किमान ७६ से.मी. (किमान ५ से.मी. फुगविणे आवश्यक)

Home Guard Bharati 2024 आवश्यक कागदपत्रे

  1. रहिवासी पुरावा (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र)
  2. शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  3. जन्मदिनांक पुरावा (SSC बोर्ड प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला)
  4. तांत्रिक अहर्ता प्रमाणपत्र (असल्यास)
  5. खाजगी नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र
  6. पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (३ महिन्यांच्या आतले)

Home Guard Bharati 2024 भरती प्रक्रिया

होमगार्ड भरती 2024 ची प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये पार पडणार आहे:

  1. ऑनलाइन अर्ज नोंदणी
  2. फिजिकल क्षमता परीक्षा
  3. कागदपत्रे पडताळणी
  4. वैद्यकीय चाचणी
  5. अंतिम निवड

Home Guard Bharati 2024 वेतन आणि भत्ते

होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता दिला जातो.

Home Guard Bharati 2024 I होमगार्ड भरतीसाठी महत्वपूर्ण तपशील

वेतन आणि भत्ते

भत्ता प्रकाररक्कम (रु.)
कर्तव्य भत्ता५७०/- प्रतिदिन
उपहार भत्ता१००/- प्रतिदिन
खिसाभत्ता (प्रशिक्षण काळात)३५/- प्रतिदिन
भोजनभत्ता (प्रशिक्षण काळात)१००/- प्रतिदिन
कवायत भत्ता९०/- साप्ताहिक

Official website : https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php

निष्कर्ष

होमगार्ड भरती 2024 महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. होमगार्ड नोकरीची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा बघता, इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दवडू नये. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, अर्ज करण्यापूर्वी सर्व तपशील काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.

होमगार्ड भरती 2024 ची संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक माहिती संबंधित अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाइटची तपासणी करावी आणि आपल्या जिल्ह्याच्या निहाय अर्ज प्रक्रियेची माहिती घ्यावी.

Leave a Reply